कु-हाकाकोडा येथे पोलीस दुरक्षेत्राच्या हाकेच्या अंतरावरील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील रहिवाशी आणि पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ. पाटील यांची तिक्शण हत्याराने हत्या रात्रीच्या वेळी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून सकाळी पेट्रोल पम्पच्या बाजूला पाटील यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
घटनास्थळी मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे पीएसआय निलेश साळुंखे यांच्यासह श्वानपथक दाखल झाले आहे. हत्या कुठल्या कारणाने झाली याचा तपास पोलीस करीत आहे. याठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची ही पोलीस तपासणी करीत आहेत.
दरम्यान कु-हाकाकोडा पोलीस दुरक्षेत्राच्या हाकेच्या अंतरावरील मुख्य बाजार पेठेतील इंडिया पेंट्रोल पंपा जवळ ही घटना घडली आहे.