पारोळा तालुक्यातील जिराळी परिसरातील घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील जिराळी शिवारातून बैल व गायी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख ३८ हजार रुपयांचा जनावरे मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भुषण भिमराव पाटील (वय ५०, रा. जिराळी ता. पारोळा) यांनी फिर्याद दिली आहे. जिराळी शिवारातील गट क्रमांक २०८/१, २३०/१ आणि २२८/१/अ या शेत परिसरातून ही चोरी झाली.
चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीचे सहा पांढऱ्या रंगाचे बैल, ३८ हजार रुपये किमतीच्या दोन गायी तसेच १० हजार रुपये किमतीचा एक गोहरा असा एकूण १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १८ मे रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते १९ मे रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. शेतकऱ्यांनी जनावरे शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा माग काढता आला नाही. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ. संदीप सातपुते करीत आहेत.









