• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर तालुक्यात हळदीच्या कार्यक्रमात राडा 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अमळनेर तालुक्यात हळदीच्या कार्यक्रमात राडा 

बुलेटच्या आवाजावरून वाद, लोखंडी काठीने डोके फोडले

मारवड (प्रतिनिधी):- हळदीच्या कार्यक्रमात बुलेटच्या सायलेन्सरचा मोठा आवाज केल्याचा जाब विचारल्याने एका तरुणावर लोखंडी काठीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना तांदळी (ता. अमळनेर) येथे घडली आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तांदळी येथील संदीप हरचंद शिरसाठ (वय ३८) यांच्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. ४ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास, गावातीलच मयूर रघुनाथ पारवे हा त्याच्या बुलेटने शिरसाठ यांच्या घरासमोर आला आणि सायलेन्सरचा कानठळ्या बसवणारा कर्कश आवाज करू लागला. संदीप शिरसाठ यांनी त्याला असा आवाज न करण्याबाबत समजावून सांगितले.

समजावून सांगितल्याचा राग आल्याने मयूर पारवे याने त्याचे वडील आणि भावाला बोलावून घेतले. त्यानंतर संशयित आरोपी रघुनाथ दगा पारवे, भूषण रघुनाथ पारवे आणि मयूर रघुनाथ पारवे या तिघांनी संगनमत करून संदीप शिरसाठ यांच्या घरात आणि अंगणात प्रवेश केला. त्यांनी शिरसाठ यांना शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याच दरम्यान मयूर पारवे याने त्याच्या हातातील लोखंडी काठीने संदीप शिरसाठ यांच्या डोक्यावर पाठीमागून जोरदार वार केला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.

या हल्ल्यानंतर संशयितांनी शिरसाठ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी संदीप शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दाखल कलमे: भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११८(१), ११५, ३५१(२), ३५२ आणि ३२४(४) नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ तुकाराम पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी करत आहेत. सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

Next Post

महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 
1xbet russia

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

May 6, 2026
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद
1xbet russia

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

May 6, 2026
बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला
1xbet russia

बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला

May 6, 2026
महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक
1xbet russia

महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

May 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

May 6, 2026
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

May 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon