जळगाव (प्रतिनिधी):- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन व स्मरण करण्यात आले.
यावेळी माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील डॉ. व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. समाजातील अस्पृश्यता, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.महात्मा ज्योतिराव फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले असून त्यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. तसेच समाजातील वंचित व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले.यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, फुले यांचे शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यांचे विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प केला.