एसीपी अशोक नखाते यांची बदली
जळगाव (प्रतिनिधी)- राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून, जळगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता संदीप रघुनाथ गावित यांची नियुक्ती करण्यात आली असून, गावित जळगावचे नवीन अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील. गृह विभागातर्फे शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.


जळगावशी जुने नाते
नवे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांचे जळगाव जिल्ह्याशी जुने नाते आहे. त्यांनी यापूर्वी जळगाव शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून यशस्वी कार्यकाळ भूषविलेला आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा जळगाव जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होणार आहे.
प्रशासकीय फेरबदल
अशोक नखाते यांनी जळगावात आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास आणि बंदोबस्ताचे काम चोख बजावले. आता त्यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी येणारे संदीप गावित हे आता जिल्ह्याच्या पोलीस दलात नेमकी काय भूमिका बजावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









