• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

दुर्मिळ ट्रकीओ-इसोफेजियल फिस्टुलावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील शल्यचिकीत्सकांसह, बालरोग तज्ज्ञांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे शिशुला नवजीवन मिळाले

जळगाव (प्रतिनिधी):- जन्मत:च गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नवजात शिशुचे प्राण डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून वाचविले. अन्ननलिका आणि श्वासनलिका एकमेकांना चिकटल्याने निर्माण झालेल्या दुर्मिळ ट्रकीओ-इसोफेजियल फिस्टुला या आजारावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे शिशुला नवजीवन मिळाले.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील प्रकाश भोई यांना बाळ झाले. जन्मानंतर लगेचच शिशुच्या तोंडातून सतत फेस येत असल्याचे पालकांच्या लक्षात आले. तसेच शिशुला दूध पाजताना अडचण निर्माण होत होती. परिस्थिती गंभीर वाटल्याने शिशुला तत्काळ जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांनी प्राथमिक तपासणी करताना शिशुला अन्ननलिकेचा गंभीर विकार असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर बालरोग तज्ज्ञ व शल्यचिकीत्सकांच्या टीमने शिशुची सखोल तपासणी केली. एक्स-रे सह विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासणीदरम्यान शिशुला ट्रकीओ-इसोफेजियल फिस्टुला हा जन्मजात आजार असल्याचे स्पष्ट झाले. या आजारात अन्ननलिका आणि श्वासनलिका एकमेकांना चिकटलेल्या असल्यामुळे अन्न किंवा दूध पोटात जाण्याऐवजी श्वासनलिकेत जाण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शिशुच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.या परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी, यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शल्यचिकीत्सकांनी ट्रकीओ-इसोफेजियल फिस्टुला रिपेयर या अत्यंत नाजूक पद्धतीचा वापर करून शस्त्रक्रिया केली. सुमारे दीड तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान अन्ननलिका आणि श्वासनलिका वेगळ्या करण्यात आल्या व त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. शुभम कालरा, डॉ. प्रज्योत कदम, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शीतल, डॉ. मारीया यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर नवजात शिशुला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. याठिकाणी विभागप्रमुख डॉ. अनंत बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. उमाकांत अणेकर यांच्या टीमने शिशुची सतत काळजी घेत आवश्यक उपचार दिले. डॉक्टरांच्या दक्ष देखरेखीमुळे शिशुची प्रकृती धोक्याबाहेर आली. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील शल्यचिकीत्सक व बालरोग तज्ज्ञांच्या समन्वयातून करण्यात आलेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे नवजात शिशुला नवजीवन मिळाले आहे.

ट्रकीओ-इसोफेजियल फिस्टुला हा नवजात शिशूंमध्ये आढळणारा दुर्मिळ पण गंभीर आजार आहे. वेळेवर निदान आणि तातडीची शस्त्रक्रिया केल्यास शिशुचे प्राण वाचवता येतात. या शिशुच्या बाबतीत पालकांनी वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे उपचार करणे शक्य झाले.

– डॉ. प्रज्योत कदम, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

Next Post

मध्य रेल्वेची ऐतिहासिक झेप : १६४ कोटींहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

मध्य रेल्वेची ऐतिहासिक झेप : १६४ कोटींहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती
1xbet russia

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

May 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण

May 25, 2026
पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ मधील मोठ्या ‘बाबा खोली’ नाल्याची स्वच्छता
1xbet russia

पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ मधील मोठ्या ‘बाबा खोली’ नाल्याची स्वच्छता

May 25, 2026
बालविवाहातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म
1xbet russia

बालविवाहातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

May 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण

May 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon