जळगाव ;– विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड स्कूल च्या ऑनलाइन पालक सभांची सुरुवात दि. १५ जून पासून करण्यात आली असून १५ ते १८ जून दरम्यान सकाळी माध्यमिक विभागाच्या पालक सभा घेतल्या जाणार आहेत. या सभांची सुरुवात १५ पासून इयत्ता ७वी आणि इयत्ता ८वी च्या वर्गाच्या सभेने करण्यात आली. या पालक सभेत दोन्ही इयत्तेचे पालक सहभागी होते त्यामध्ये इयत्ता ८वी चे ९७ पालक तर इयत्ता ७वी चे ९६ पालक सहभागी झाले होते. या सभेत प्राचार्य अमितसिंह भाटिया यांनी पालकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. सौ. कविता राणे व सौ. वंदना पाटील व सौ मोनाली पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
इयत्ता ९वी ,१०वी च्या वर्गांचे १५जून पासून दररोज शाळेच्या वेळात तासिकांप्रमाणे ऑनलाइन शाळा सुरु करण्यात आली असून दि. १८ जून पासून इयत्ता ६वी ते ८वी च्या वर्गांची ऑनलाइन शाळा सुरु होणार आहे. या पालक सभांची तांत्रिक बाजू शाळेच्या समन्वयिका सौ. संगीता तळेले, सौ. रुपाली पाटील, निलेश बडगुजर, अशोक पाटील, अनिरुध्ध डावरे यांनी संभाळली. पालकांनी देखील शाळेच्या ऑनलाइन शाळा उपक्रमाचे स्वागत केले.