जिल्हापेठ पोलिस स्टेशनची कामगिरी
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात कुरिअरचे पार्सल चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला (विधी संघर्षीत बालक) जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे ९७ हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.


जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील श्री स्वामी ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोरून ५ मोबाईल असलेले कुरिअरचे बॉक्स चोरीला गेले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलाला शोधून काढले. पोलिसांनी त्या मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संबंधित मुलाने चोरलेले कंपन्यांचे ४ मोबाईल पोलिसांकडे जमा केले आहेत: एकूण जप्त मुद्देमाल ९६,९९६ रुपयेचा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोह महेंद्र पाटील, नरेश सोनवणे, संतोष सोनवणे, तेजस मराठे, प्रविण जाधव, प्रशांत लाड आणि चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार महेंद्र पाटील करत आहेत.









