१५० च्यावर रूग्णांची तपासणी, ७५ रूग्णांवर होणार शस्त्रक्रिया, उर्वरीत रूग्णांना दिला पुढील उपचाराचा सल्ला
जळगाव (प्रतिनिधी):- तिरळेपणा आणि पडलेल्या पापणीची मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान पुण्याचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आज जळगावात दाखल होणार आहे.
तिरळेपणा या डोळ्यांच्या आजारावर उपचारासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरात जाण्याची गरज आता राहिलेली नाही. जळगावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जळगाव खुर्द येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय येथे तिरळेपणा व पडलेली पापणी यासाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात दि १ व २ एप्रिल रोजी १५० रूग्णांची तपासणी करण्यात येवून त्यातील ७५ रूग्णांवर पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान पुण्याचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.मधुसूदन झंवर हे स्वता दि ५ एप्रिलपर्यत शस्त्रक्रिया करणार आहे. या विशेष शिबिरात डॉ. झंवर यांच्यासोबत २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे. डॉ. झंवर यांना तिरळेपणा शस्त्रक्रियेचा तीन दशकांहून अधिक अनुभव असून ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांसाठी त्यांनी १९८ नेत्रशिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत.या टीमची लिम्का गु्रप ऑफ रेकॉर्ड सह आतंरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. तिरळेपणा मुक्त जळगाव जिल्हा हा उद्देश ठेवून हे शिबिर आयोजित करण्यात आले असून जळगाव व परिसरातील रुग्णांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. बाहेरगावातील रूग्ण व नातेवाईकांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे.