डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तिरळेपणावर शिबीराला प्रारंभ, १३५ रूग्णांची नोंदणी आज व उद्या तपासणी झालेल्या रूग्णांवर ३ ते ५ एप्रिल दरम्यान मोफत शस्त्रक्रिया
जळगाव (प्रतिनिधी):- स्व. गोदावरी आईच्या जयंतीनिमीत्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे मोफत तिरळेपणा दुरूस्ती शस्त्रक्रिया व पडलेल्या पापणीवरील शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन ३ ते ५ एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. या शिबीराला बुधवारपासून सुरूवात झाली असून आज व उद्या रूग्णांची तपासणी केली जात आहे. १३५ रूग्णांनी या शिबिरासाठी नाव नोंदणी केली आहे.


शिबिरात पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठाण पुणे येथील प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर शस्त्रक्रिया करणार असून त्यांना ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच त्यांनी २६ जिल्ह्यांमध्ये १९८ शिबीरे यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्यांच्यासोबत २० तज्ञ डॉक्टरांची टीम देखिल दि ३ रोजी जळगावात दाखल होत असून ज्या रूग्णांना शस्त्रक्रियेची गरज असेल अशा सर्व रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. स्व. गोदावरी आईच्या जयंतीनिमीत्त संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, वैद्यकिय संचालक व नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. एन एस आर्विकर, डॉ. रेणुका पाटील, यांचेसह तज्ञ डॉक्टरांची टीमने प्रतिमा पुजन व पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहीली. यानंतर चिमकुल्या रूग्णांना बिस्कीट व चॉकलेट वाटप करण्यात आले. आज दि १ रोजी ६५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. उर्वरीत रूग्णांची उदया तपासणी करण्यात येणार आहे. अजूनही ज्या रूग्णांनी नाव नोंदणी केली नाही अशा रूग्णांनी उदया तपासणीसाठी यावे असे रूग्णालय प्रशासनाने कळवले आहे.









