• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावात गावठी कट्ट्यातून गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
टोळक्याचा तरुणांवर हल्ला : एकावर गोळीबार, दुसऱ्यावर शस्त्राने वार !

हनुमानवाडी परिसरातील घटना; ५ जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव (प्रतिनिधी):- शहरातील हनुमानवाडी भागात गावठी कट्ट्यातून (पिस्तूल) गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी याप्रकरणी मुख्य संशयितासह पाच जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी सिकंदर शेख निसार शेख (वय ३६, रा. अनिल नगर, चाळीसगाव) हे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. दि. १५ मार्च रोजी रात्री ८:१५ ते ८:३० वाजेच्या सुमारास त्यांना संशयित आरोपी अंकित मोरे याने हनुमानवाडीतील आपल्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये बोलावून घेतले. त्या ठिकाणी अंकित मोरे, मेहुल रत्नपाल मोरे, कृष्णा जिभाऊ झेल्टे आणि इतर दोन अनोळखी तरुण उपस्थित होते.

फिर्यादीनुसार, अंकित मोरे याच्या सांगण्यावरून तेथे असलेल्या एका अनोळखी तरुणाने त्याच्याकडील दोन गावरान कट्टे दाखवले. “हे बघ मख्खन जैसा है” (हे लोण्यासारखे मऊ चालते) असे म्हणत त्याने कट्ट्याचा खटका दाबला. यावेळी अचानक गोळी सुटली आणि ती थेट सिकंदर शेख यांच्या उजव्या खांद्यात घुसली. गोळी लागल्याने सिकंदर शेख रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि गंभीर जखमी झाले. गोळी लागल्यानंतर जखमी सिकंदर यांना मदत करण्याऐवजी अंकित मोरे याने त्यांना धमकावले. “इथून निघून जा, कोणाचेही नाव घेऊ नको,” अशी धमकी देऊन सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी तातडीने सूत्रे हलवली. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पंडित माळी करत आहेत. शहरात अशा प्रकारे सर्रासपणे घातक शस्त्रांचा वापर होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

Next Post

गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon