जळगावातील धक्कादायक घटना; २ लाखांचा ऐवज मित्रांच्या मदतीने लंपास, तिघांना बेड्या
जळगाव (प्रतिनिधी) : रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना शहरात उघडकीस आली आहे. भाचीच्या लग्नासाठी आत्याने अत्यंत कष्टाने जमवून ठेवलेल्या दोन लाख रुपयांहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर खुद्द सख्ख्या भाच्यानेच डल्ला मारला. आपल्या तीन मित्रांच्या मदतीने ही चोरी करणाऱ्या भाच्यासह तिघांना रामानंद नगर पोलिसांनी अटक केली असून, एक जण अद्याप फरार आहे.
लग्नासाठी साठवलेला दागिना लंपास
राजीव गांधी नगर परिसरात राहणाऱ्या सुनीता वामन लोंढे (वय ३४) यांनी आपल्या भाचीच्या लग्नासाठी सोन्याचे दागिने जपून ठेवले होते. यामध्ये १० ग्रॅम व ३ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या पोत, ८ ग्रॅमची कर्णफुले आणि ४० हजार रुपये किमतीच्या कानातील साकळ्या असा एकूण २ लाख ८ हजार रुपये किमतीचा ऐवजी एका पेटीत सुरक्षित ठेवला होता. मात्र, २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ही पेटीच घरातून गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

असा उघड झाला भाच्याचा कारनामा
दागिने चोरीला गेल्याचे समजताच सुनीता लोंढे यांनी घरच्यांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांचा भाचा समाधान लोंढे हा मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद रित्या घराबाहेर जाताना दिसल्याची माहिती समोर आली. संशय बळावल्याने आत्याने जेव्हा समाधानला विश्वासात घेऊन विचारणा केली, तेव्हा त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने ही पेटी चोरल्याची कबुली दिली. मात्र, वारंवार विनवणी करूनही त्याने दागिने परत न केल्याने अखेर हतबल होऊन आत्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांची धडक कारवाई
या प्रकरणी १ मार्च रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत समाधान लोंढे, प्रेम संजू सकट आणि निखील लक्ष्मण हागडगे या तिघांना अटक केली. या गुन्ह्यात सहभागी असलेला साहील अवचारे हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस कर्मचारी जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत आणि नीलेश पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. घरच्याच व्यक्तीने अशा प्रकारे विश्वासघात केल्याने लोंढे कुटुंबासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलीस करत आहेत.