चार दिवस विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी महाविद्यालय परिसर दुमदुमला
जळगाव (प्रतिनिधी ) – गोदावरी फॉउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर जळगाव येथे आयोजित कृषीविश्व २०२६ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने व आनंदमय वातावरणात पार पडला. विविध स्पर्धा, उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांनी महाविद्यालय परिसर दुमदुमला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, डॉ. पी. आर. सपकाळे, प्राचार्य डॉ. उ. पा. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. ए. पी. चौधरी (शिक्षण व संशोधन संचालक, गोदावरी कृषी संकुल), मोहन सुर्यवंशी (प्रशासकीय अधिकारी) तसेच उपप्राचार्य प्रा. पी. एस. देवरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते औक्षण, रिबीन कापून उद्घाटन, प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. शैलेश तायडे यांनी स्नेहसंमेलनाचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, तसेच आयोजनासाठी परिश्रम घेणार्या विद्यार्थी समितीचे विशेष कौतुक करण्यात आले.स्नेहसंमेलनादरम्यान मंडला आर्ट, पोस्टर मेकिंग, वन मिनिट टास्क, अंताक्षरी आदी स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वन मिनिट टास्क स्पर्धेत महेश पाटील व दिशा वाघ विजेते ठरले. मंडला आर्ट व पोस्टर स्पर्धेत कृष्णराज सोनवणे प्रथम, नेत्रा खराटे द्वितीय व दिशा वाघ तृतीय क्रमांकावर राहिले.दुसर्या दिवशी ग्रुप डे, ट्विन डे, रांगोळी स्पर्धा, म्युझिकल चेअर व दोरखेच ( टग ऑफ वॉर) स्पर्धा घेण्यात आल्या. म्युझिकल चेअर स्पर्धेत आरती वालवी, भावना दलाल व राज कुरे यांनी यश मिळवले. रांगोळी स्पर्धेत दिशा वाघ प्रथम, यश पवार व समूह द्वितीय, तर प्रियांका गावित तृतीय ठरली.तिसर्या दिवशी ‘बॉलिवूड डे’ व ‘फिश पाँड’ कार्यक्रम रंगला. रॅम्प वॉक स्पर्धेत श्रुस्ती डोंगरे प्रथम व पूर्वजा कुमावत द्वितीय ठरल्या. चौथ्या दिवशी नृत्य, नाटिका, माइम, गीत गायन व मिमिक्री स्पर्धांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. एकल नृत्य स्पर्धेत श्रुस्ती डोंगरे प्रथम व साक्षी बहेकर द्वितीय ठरल्या. समूह नृत्यात युगल धाके व समूह विजेते, तर हिटर्स समूह उपविजेते ठरले. माइम स्पर्धेत ७/१२ समूह प्रथम आला, तर नाटिका स्पर्धेत तृतीय वर्षाचे विद्यार्थी विजयी ठरले. मिमिक्रीमध्ये अमोड अख्तर प्रथम व नीरज सोनवणे द्वितीय ठरले. गीत गायन स्पर्धेत धीरज खेडकर प्रथम तर उदय माळी उपविजेता ठरला.समारोप समारंभ प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय बाविस्कर (मुख्य कार्यकारी अधिकारी) व डॉ. ए. पी. चौधरी उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांना चषक, पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. एस. एन. पाटील तसेच प्रा. करन बन्सोडे, प्रा. एन. बी. सदार, प्रा. व्ही. एस. पाटील, प्रा. कार्तिक खर्चे, प्रा. सागर ठाकरे, प्रा. केशव पराशर, डॉ. प्रीती दातीर, प्रा. प्रियल राठी, प्रा. सायली विधाते, डॉ. एम. एस. भावसार आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.त्यानंतर आयोजित डीजे नाईटमुळे स्नेहसंमेलनाचा उत्साह शिगेला पोहोचला.










