जळगाव शहरातील जोशी कॉलनीत घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील जोशी कॉलनी परिसरात एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रथम हरीश कटारे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो ला. ना. शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम कटारे हा अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याला रागावली होती. या कारणामुळे तो मनाने खचला आणि घरात कोणी नसल्याची संधी साधत त्याने राहत्या घराच्या छताला गळफास घेतल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने धाव घेतली; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.








