८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातून स्कुटी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीची स्कुटी, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी गणेश तानाजी गवळी यांची स्कुटी आणि मोबाईल दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री चोरीला गेला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस उप-निरीक्षक शेखर डोमाळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला. या पथकाने सायगव्हाण (ता. कन्नड) येथील तीन संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी
१. मनोज छोटू मोरे (१९, रा. सायगव्हाण – याला श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले)
२. आदित्य बाजीराव वाघ (२१, रा. सायगव्हाण)
३. विनोद रामदास सौदाणे (१९, रा. सायगव्हाण)
जप्त केलेला मुद्देमाल (किंमत ८५ हजार रुपये)
आरोपींची चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आला आहे.vसदर यशस्वी कारवाईत HC संदीप पाटील, PC सागर पाटील आणि चालक PC बाबासाहेब पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.









