जळगाव (प्रतिनिधी):- गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रेरणास्थान डॉ. उल्हास पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा संदेश देणार्या या उपक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचार्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. उल्हास पाटील (अध्यक्ष, गोदावरी फाउंडेशन), प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. अनिल पाटील, नेत्ररोग तज्ञ डॉ. पंकज शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, उपप्राचार्य प्रा. प्रवीण फालक, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, रजिस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव तसेच गोदावरी फाउंडेशनअंतर्गत सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय गोदावरी आजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार










