जळगाव – ( प्रतिनिधी ) कुसुबा येथून शहराकडे जाणाऱ्या दोन आरोपींच्या ताब्यातून एम आय डी सी पोलिसांनी 3 हजार रुपये किंमतीची 25 लिटर गावठी हातभट्टी ची दारू जप्त करून पिता व पुत्र असलेल्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे .
खबऱ्याने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या सूचनेवरून आज ( शनिवार ) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास एम आय डी सी पोलिसांनी रेमंड चौफुली जवळ ही कारवाई केली. भागवत महाजन आणि प्रवीण महाजन अशी या आरोपींची नावे आहेत एरंडोल तालुक्यातील नागदुलीचे ते मूळ रहिवाशी आहेत . 30 हजार रुपये किंमतीची एम एच 19 सी इ 5770 क्रमांकाची या आरोपींच्या ताब्यातील हिरो होंडा मोटरसायकल सुद्धा जप्त करण्यात आली आहे पंचनाम्या च्या आधारावर पो कौ चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून या आरोपींविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर दोन्ही आरोपी है मुलगा व बाप असून ते आज रोजी गावठी दारू वाहतूक करीत असतांना मिळून आले आहे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाईक पोलीस कॉन्स्टेबल मुदस्सर काझी करीत आहे