जळगाव (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी छत्रपतींची आचार विचार अंमलात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार सर्वांनी केला.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज दि.१९ रोजी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकारांतर्फे महाराजांना अभिवादन करण्यात आले. प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी, महासचिव भगवान सोनार यांनी मार्गदर्शन केले. महाराजांना अभिवादन करून सर्वांनी जोरदार जयजयकार केला.
प्रसंगी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चेतन वाणी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, प्रसिद्धी प्रमुख विश्वजीत चौधरी, योगेश चौधरी, योगेश सुने, जेष्ठ पत्रकार लालचंद अहिरे, विकास चव्हाण, संधिपाल वानखेडे, हेमंत शर्मा, विलास सोनार, मनोज जोगी, किशोर शिंपी, मीनाक्षी चौधरी, मुजम्मिल सैय्यद आदी उपस्थित होते.








