जळगाव (प्रतिनिधी):- येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये ’रेट्रो थीम’वर आधारित ’फिजिओफेस्ट २०२६’ मोठ्या जल्लोषात पार पडला. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी जुन्या काळातील सुवर्णयुग आपल्या कलाविष्काराने जिवंत केले.कार्यक्रमाचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुढील मान्यवर उपस्थित होते डॉ. एन.एस. आर्विकर (संचालक, वैद्यकीय महाविद्यालय), डॉ. प्रशांत सोळंके (डीन), डॉ. जयवंत नागुलकर (प्राचार्य, फिजिओथेरपी महाविद्यालय), प्रमोद भिरूड (रजिस्ट्रार), डॉ. माया आर्विकर, डॉ. प्रेमचंद पंडित (अधीक्षक), डॉ. विजय बाविस्कर (सीईओ), वैद्य हर्षल बोरोले (अधिष्ठाता, आयुर्वेद महाविद्यालय),श्री. राहुल गिरी (प्रशासकीय अधिकारी), डॉ. अमित जैस्वाल, डॉ. आशिष पाटील आणि डॉ. अनुराग मेहता. यावर्षीच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ’रेट्रो थीम’ ही होती. विद्यार्थ्यांनी जुन्या काळातील दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींच्या भूमिका हुबेहूब साकारल्या. गीत, नृत्य आणि प्रभावी अभिनयाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले. त्यांनी विशेषतः डॉ. मनोज सुर्यवंशी, डॉ. कृतिका काळे आणि विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांचे प्रोत्साहन वाढवले.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन डॉ. श्रृती, फाल्गुनी सातव, आदित्य अग्रवाल, डॉ. मेहवीश, सुमेधा यश आणि पवन कलश यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांनी सर्वांचे आभार मानले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी परिषदेचे सदस्य ओम चौधरी, दिशाली वैराळकर, चंदन मौर्य, सुशांत शिसोदे, मृणाल सावळे, राधिका अरबट, अश्विनी नाईक, सनी इंगळे, अथर्व बोडद, कल्पेश निकुंभ, कुलदीप इंगळे तसेच महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.










