सात दिवसीय ‘श्रमसंस्कार’ शिबिराची सांगता
आमोदे (ता. यावल) – डा. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे आमोदे येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.



योगासन, प्राणायाम आणि ध्यान राष्ट्रीय सेवा योजना गीते, विद्यापीठ गीत आणि राष्ट्रगीताच्या पठणाने दिवसाची शिस्तबद्ध सुरुवात करण्यात आली. दररोज सकाळी प्रभातफेरी काढून ‘पाण्याचे पुनर्भरण – जीवनाचे संवर्धन’, ‘स्वच्छ सृष्टी’ आणि ‘सिग्नल पाळा – जीवन वाचवा’ असे संदेश दिले गेले. सात दिवसाच्या या कार्यशाळेत प्रा. करण बनसोडे यांनी सेंद्रिय फख उत्पादन,प्रा. एन बी. सदार यांनी नैसर्गिक शेतीचे फायदे/तोटे ,प्रा. एस एन. पाटील यांनी पीक विमा,जैविक घटकांवर प्रा. सायली विधाते,डॉ. मोनिका भावसार यांनी शाश्वत शेती व मातीतील सेंद्रीय कर्ब , डॉ. प्रीती दातीर यांनी महिला सक्षमीकरण व व्यक्तिमत्त्व विकास विषयावर व्याख्यान दिले व एसडब्ल्युओटी तपासणीचे महत्त्व सांगितले.समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. एस. सी. तायडे अध्यक्षस्थानी होते, प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फाउंडेशन चे प्रशासकीय अधिकारी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे दूत बनून शेतकर्यांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. बी. एम. गोणशेतवाड यांनी ‘विकसित भारत’ संकल्पना मार्गदर्शित केली.शिबिराच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. आर. डी. चौधरी,रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रीती दातीर, तसेच उद्यान विद्या तंत्रज्ञ प्रा. करण बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराची सांगता करत डॉ. प्रीती दातीर यांनी आभार प्रदर्शन केले.









