राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम
जळगाव (प्रतिनिधी) :- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रस्ता सुरक्षा शपथ घेतली व ट्रॅफिकचे सर्व सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे वचन दिले.



महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अध्यक्षीय भाषणात सर्वांना रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.विद्यार्थी पार्थ पवार आणि यश पाटील यांनी रस्ता सुरक्षिततेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. आर.डी. चौधरी यांनी महत्त्वाचे निर्देश देत सांगितले की हेल्मेट न वापरणार्यांना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश न देण्याचे निगराणी व पहारेकरींना सुचना दिली. डॉ. प्रीती दातीर, रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी रस्ता सुरक्षा नियमांची माहिती विविध उदाहरणांसह देत त्यांच्या अंमलबजावणीची गरज स्पष्ट केली. या कार्यक्रमात सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









