• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मेंदूज्वर आजाराच्या चिमुकलीवर यशस्वी उपचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 31, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मेंदूज्वर आजाराच्या चिमुकलीवर यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश

जळगाव ( प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर तालुयातील दीड वर्षीय चिमुकलीला मेंदूज्वर या गंभीर आजारावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार करून तिचे प्राण वाचवण्यात डॉटरांना यश आले आहे. अचानक आलेल्या झटयांमुळे आणि शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळेवर मिळालेल्या तज्ज्ञ वैद्यकीय सेवेमुळे चिमुकली आता पूर्णपणे सुधारून घरी परतली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुयातील या दीड वर्षीय मनस्वी पाटील ह्या चिमुकलीला अचानक तीव्र तापासोबत झटके येऊ लागले. झटयांनंतर तिच्या शरीराची हालचाल मंदावली, प्रतिसाद कमी झाला तसेच बेशुद्धावस्थेसारखी स्थिती निर्माण झाली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने तिला जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल होताच बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. सुयोग तन्नीरवार यांच्यासह तज्ज्ञांच्या टीमने तातडीने तपासणी सुरू केली. चिमुकलीच्या प्रकृतीची तीव्रता लक्षात घेऊन पाठीतील पाण्याची तपासणी करण्यात आली. यासोबतच सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासणी करून मेंदूतील स्थितीची सखोल पाहणी करण्यात आली. सर्व तपासण्यांच्या आधारे चिमुकलीला मेंदूज्वर असल्याचे निदान झाले.निदान होताच तिला तातडीने बालरोग अतिदक्षता विभागात  दाखल करण्यात आले. येथे तज्ज्ञ डॉटर, अनुभवी नर्सिंग स्टाफ आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या मदतीने २४ तास निरीक्षणाखाली उपचार सुरू करण्यात आले. झटके थांबवण्यासाठी आवश्यक औषधोपचार, मेंदूतील सूज कमी करण्यासाठी उपचार, ताप नियंत्रण, द्रवपदार्थ आणि पोषण व्यवस्थापन अशा सर्वांगीण उपचारांची योजना राबवण्यात आली.सततच्या तज्ज्ञ निरीक्षणामुळे आणि वेळेवर योग्य औषधोपचारामुळे अवघ्या आठवडाभरात चिमुकलीचे झटके नियंत्रणात आले. हळूहळू तिच्या शरीराची हालचाल सुधारू लागली, शुद्धीवर येण्याची प्रक्रिया वेगाने झाली आणि प्रतिसादही पूर्ववत होऊ लागला. डॉटरांच्या पथकाने केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली.औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर आणि सर्व तपासण्या समाधानकारक आल्यानंतर चिमुकलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कुटुंबीयांनी डॉटरांचे व रुग्णालयातील संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले. औषधोपचारासाठी डॉ. कुशल धांडे, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. अभिजीत अरमाळ, डॉ. निरज जगताप, भारती झोपे, हिरामण लांडगे यांच्यासह नर्सिंग स्टाफने परिश्रम घेतले.

मेंदूज्वर हा लहान मुलांसाठी अतिशय गंभीर आजार असून वेळेवर उपचार न मिळाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. या चिमुकलीला योग्य वेळी रुग्णालयात आणल्यामुळे तातडीने तपासण्या करून अचूक निदान करता आले. बालरोग अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ उपचारांमुळे झटके नियंत्रणात आले आणि मुलीची प्रकृती सुधारली. पालकांनी मुलांमध्ये अचानक ताप, झटके, शुद्धी कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता तातडीने तज्ज्ञ रुग्णालयात दाखल करावे.

-डॉ. अभिजीत अरमाळ,
निवासी
डॉ. उल्हास पाटील रूग्णालय, जळगाव.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

Next Post

माती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
माती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी

माती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
1xbet russia

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
जैन कंपनी

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

March 20, 2026
जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक
Uncategorized

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon