राज्य उत्पादन शुल्कासह क्रीडा खाते राहण्याची शक्यता
मुंबई ( वृत्तसेवा ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांची सर्व आमदारांनी विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने दुपारी निवड केली. त्यानंतर आता संध्याकाळी ५ वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपालांच्या उपस्थितीत घेतली.


राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित अनंतराव पवार यांचा बुधवार दि. २८ रोजी एका भीषण विमान अपघातामध्ये बारामती तालुक्यातच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत इतर ४ जणांनाही प्राण गमवावे लागले. यानंतर आता उपमुख्यमंत्रीपदी सर्व आमदार आणि नेत्यांच्या आग्रहाखातर व एकमताने दुपारी सुनेत्रा अजित पवार यांची विजयी मंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. विधिमंडळ गटनेते झाल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपवले. यानंतर राष्ट्रवादीचे नेत्यांनी राज्यपालांना पत्र दिले. या पत्रानंतर राजाभवनामध्ये शपथविधीची तयारी सुरू झाली. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, यांच्या सह आमदार आणि इतर मोजके लोकांचे उपस्थितीत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत.









