जळगाव शहरात हनुमान नगरात पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी – शहरात मानव तस्करी आणि अवैध वेश्या व्यवसायाविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. हनुमान नगर भागात एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या विजय सखाराम तायडे या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखा आणि मानव तस्करी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना हनुमान नगर परिसरात एका घरात अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि एका ‘बोगस गिऱ्हाईका’मार्फत खात्री केली. खात्री पटताच पथकाने घरामध्ये छापा टाकला, जिथे विजय तायडे याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवल्याचे स्पष्ट झाले.
संशयित आरोपी विजय तायडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिडीत अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात पोक्सो आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे , गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, स. फौ. अतुल वंजारी, पोहेकों नितीन बाविस्कर, अक्रम शेख, विजय पाटील पोना किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे तसेच मानव तस्करी विरोधी पथक जळगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, सफौ. संजय हिवरकर, रविंद्र पाटील, रविंद्र गायकवाड, अनिल पाटील, महिला सहाय्यक फौजदार निलीमा सुशिर, पोहेकों जितेंद्र पाटील, भुषण कोल्हे, वहिदा तडवी, पोकॉ राहुल वानखेडे अशांनी कार्यवाही केली आहे. सदर बाबतीत पोस्को व पिटा कायदे अंतर्गत एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन चे पो.उप.निरीक्षक अशोक काळे हे करीत आहे. संशयित आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.









