जळगाव प्रतिनिधी : शहरातील ममुराबाद रोड परिसरातील सिकवाल नगरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित राजेश माळी (वय ३२, रा. सिकवाल नगर, जळगाव) हे खाजगी नोकरी करतात. दि. २२ जानेवारी २०२६ च्या रात्री १० ते दि. २३ जानेवारीच्या सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाची कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली सोन्याची आणि चांदीची अंगठी असा ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी अमित माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नरेंद्र देवीदास पाटील करत आहेत.









