विचार वारसा फाउंडेशनचा उपक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विचार वारसा फाउंडेशनच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेहरूण परिसरात सोमवारी (१९ जानेवारी) अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी महाराणा प्रताप यांच्या देदिप्यमान इतिहासावर प्रकाश टाकला.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना विशाल देशमुख म्हणाले की, “महाराणा प्रताप हे केवळ मेवाडचे राजे नव्हते, तर ते स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक होते. त्यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला, मात्र कधीही शरणागती पत्करली नाही. त्यांचा हाच ज्वलंत वारसा आजच्या तरुण पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे.”
या कार्यक्रमाला यावेळी विचार वारसा फाउंडेशन आशिष राजपूत, मनिष चौधरी, गितेश पवार, आकाश राजपूत,निखिल शेलार, अविनाश पाटील, संकेत म्हस्कर, चेतन माळी, पार्थ वाघ, शुभम निकम, अलका देशमुख, पूजा देशमुख, संगीता राजपूत, अर्चना सोले, सुषमा काकडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेहरूण परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. महाराणा प्रताप यांच्या कार्याचा जयघोष करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.









