अरविंद देशमुखांना विक्रमी मते, तर माजी मंत्री देवकर यांच्या पुत्राचा विजय
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात महायुतीने (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अजित पवार गट) आपले वर्चस्व कायम राखले आहे. प्रभाग १५ मध्ये मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांनी विक्रमी मताधिक्य मिळवले असून, प्रभाग १३ मध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे पुत्र प्रफुल्ल देवकर यांनी विजय संपादन केला आहे. प्रभाग १६ मध्ये भाजपने निर्विवाद मुसंडी मारली आहे.

प्रभाग क्रमांक १३ : देवकर पुत्राचा उदय आणि भाजपची सरशी
प्रभाग १३ (अ): भाजपचे नितीन प्रभाकर सपके ८,७४० मते मिळवून विजयी झाले. त्यांनी अपक्ष एड. सत्यजित पाटील (९८९ मते) यांचा ७,७५१ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. राष्ट्रवादी (शप) चे हेमंत सांगळे यांना ७७२ मते मिळाली, तर ४३५ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. प्रभाग १३ (ब): भाजपच्या सुरेखा नितीन तायडे ७,३१४ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष डॉ. अश्विनी वाघ (१,५३६ मते) यांचा ५,७७८ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी (शप) च्या देवयानी चौधरी यांना ९८९, अपक्ष हर्षा पवार ४४४, प्रियांका तायडे १३१ आणि नोटाला ६१४ मते मिळाली. प्रभाग १३ (क): भाजपच्या वैशाली अमित पाटील या जागेवरून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. प्रभाग १३ (ड): राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे प्रफुल्ल गुलाबराव देवकर ४,९५९ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी अपक्ष जितेंद्र मराठे (४,०८४ मते) यांचा ८७५ मतांनी पराभव केला. येथे राष्ट्रवादी (शप) चे सुहास पाटील ७७०, आपचे संजय निकुंभ ५७, अनिल पगारिया ५३, मगन पाटील ७५, गणेश शिरसाठ ६३३ आणि नोटाला ३९८ मते मिळाली.
प्रभाग क्रमांक १५: अरविंद देशमुखांचा रेकॉर्डतोड विजय
प्रभाग १५ (अ): मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद भगवान देशमुख यांनी १०,७२२ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांनी अपक्ष गणेश बागडे (१,८८२ मते) यांचा ८,८४० मतांच्या प्रचंड मताधिक्याने पराभव केला. ८५४ जणांनी नोटा पर्यायाला पसंती दिली. प्रभाग १५ (ब): भाजपच्या कलाबाई नारायण शिरसाळे ८,९३८ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष प्रिया केसवानी (३,४५९ मते) यांचा ५,४७९ मतांनी पराभव केला. साक्षी जाधव यांना ४५५ आणि नोटाला ६०६ मते मिळाली. प्रभाग १५ (क): शिवसेनेच्या (शिंदे गट) रेश्मा कुंदन काळे (आहुजा) ९,४७८ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी (शप) च्या रेखा भालेराव (१,८५० मते) यांचा ७,६२८ मतांनी पराभव केला. अपक्ष रूपाली चौधरी यांना १,५२८ आणि नोटाला ६०२ मते मिळाली. प्रभाग १५ (ड): भाजपचे प्रकाश रावलमल बालानी ९,२६० मते मिळवून विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे संजय तायडे (२,१४५ मते) यांचा ७,११५ मतांनी पराभव केला. अपक्ष जितेंद्र कुकरेजा ४९९, खूपचंद साहित्य ४५९, खुशाल शर्मा ३५०, चेतन चांगले १६१ आणि नोटाला ५८४ मते मिळाली.
प्रभाग क्रमांक १६: भाजपचे वर्चस्व कायम
प्रभाग १६ (अ): भाजपचे डॉ. विश्वनाथ सुरेश खडके या प्रभागातून बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग १६ (ब): भाजपच्या वंदना संतोष इंगळे ७,२३० मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष हर्षाली कोल्हे (४,९३५ मते) यांचा २,२९५ मतांनी पराभव केला. ६३५ मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग १६ (क): भाजपच्या माजी नगरसेविका रंजना विजय वानखेडे ५,६५५ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष इच्छा अत्तरदे (५,२५७ मते) यांचा ३९८ मतांच्या अटीतटीच्या फरकाने पराभव केला. अपक्ष मयुरी चौथे ७९५, अंजू निंबाळकर ४९१, मीनल मावळे २३८ आणि नोटाला ३६३ मते मिळाली. प्रभाग १६ (ड): भाजपचे सुनील वामनराव खडके १०,६८८ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी मनसेचे ललित शर्मा (१,०९६ मते) यांचा ९,५९२ मतांच्या प्रचंड फरकाने पराभव केला. स्वराज्य शक्ती सेनेचे अमोल चौधरी ३१९ आणि नोटाला ६९६ मते मिळाली.
००००००००००००००








