महाजन दांपत्यासह माजी नगरसेवक इब्राहिम पटेल विजयी
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीत मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक १४ आणि १७ चे निकाल धक्कादायक आणि चुरशीचे ठरले आहेत. प्रभाग १४ मध्ये भारतीय जनता पक्षाने ‘क्लीन स्वीप’ देत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर प्रभाग १७ मध्ये शिवसेना ठाकरे गटाने मुसंडी मारत सर्व जागांवर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे माजी महापौर जयश्री महाजन आणि त्यांचे पती सुनील महाजन या दांपत्याने विजय मिळवला असून, ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते इब्राहिम पटेल यांनी निसटता विजय संपादन केला आहे.

प्रभाग क्रमांक १४: भाजपची एकतर्फी सत्ता
प्रभाग १४ (अ): भाजपचे सुनील सुपडू महाजन ५,२२४ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी एमआयएमचे सरफराज शेख (३,३१५ मते) यांचा १,९०९ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी (शप) चे अशोक लाडवंजारी यांना ८३५, अपक्ष एड. सचिन हटकर यांना ७०९ मते मिळाली, तर १२० मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला.प्रभाग १४ (ब): माजी महापौर आणि भाजप उमेदवार जयश्री सुनील महाजन ५,०६६ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी एमआयएमच्या रेहानाबी शेख आसिफ (३,४७३ मते) यांचा १,५९३ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी (शप) च्या नाझमीन तडवी यांना ७१०, काँग्रेसच्या शिरीन पटेल ५६७, अपक्ष प्रियांका पारधी १४५ आणि नोटाला २४३ मते मिळाली.
प्रभाग १४ (क): भाजपच्या रब्बीयाबी अमजद खान ४,८८८ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी एमआयएमच्या शकीलाबी पठाण (३,४३२ मते) यांचा १,४५६ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी (शप) च्या सना शेख यांना ८३७, अपक्ष खुशबू जैन ५७५, समाजवादी पार्टीच्या शमीना शेख १३६, अपक्ष रिझवानाबी खान ६५ आणि नोटाला २७० मते पडली. प्रभाग १४ (ड): भाजपचे तरुण उमेदवार रितिक संजय ढेकळे ५,१५५ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी एमआयएमचे इम्रान शब्बीर पटेल (३,५०६ मते) यांचा १,६४९ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी (शप) चे जमीलोद्दीन शेख ५८०, काँग्रेसचे जाकीर बागवान ५६५, समाजवादी पार्टीचे बबलू शेख १०५, अपक्ष अजमल खान ६४, नजीम शेख ५७ आणि नोटाला १७२ मते मिळाली.
प्रभाग क्रमांक १७: शिवसेना ठाकरे गटाचा ‘क्लीन स्वीप’; इब्राहिम पटेल यांचा थरारक विजय
प्रभाग १७ (अ): शिवसेना ठाकरे गटाच्या जरीना शब्बीर शाह ६,०९३ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या हिना युनूस पिंजारी (४,०४९ मते) यांचा २,०४४ मतांनी पराभव केला. अपक्ष मेहमुदाबी शेख यांना ३,२९८, जयश्री वंजारी १,१७०, चेतना कोल्हे ५२३ आणि नोटाला ३१२ मते मिळाली.प्रभाग १७ (ब): शिवसेना ठाकरे गटाच्या हिना बी शाकीर खान ५,०२५ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी एमआयएमच्या जैनाब पटेल (३,८९६ मते) यांचा १,१२९ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी (अपग) च्या सुमय्या पटेल यांना २,५६३, काँग्रेसच्या शहीदाबी शेख १,७२८, अपक्ष पूनम सोनवणे १,२९९, समाजवादी पार्टीच्या मुमताज बी शेख ४१२, अपक्ष सालेहा पटेल २१५ आणि नोटाला ३०९ मते मिळाली.
प्रभाग १७ (क): या जागेवर सर्वात चुरशीची लढत झाली. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी ४,१४५ मते मिळवत विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे सैफुल्ला इनामदार (४,१२२ मते) यांचा केवळ २३ मतांच्या निसटत्या फरकाने पराभव केला. राष्ट्रवादी (अपग) चे इक्बाल बिरजादे यांना २,५२४, एमआयएमचे खालील खाटीक १,९९७, अपक्ष उज्वल पाटील ९६९, निजाम खान ५६८, सोहेल शेख ५४३, समाजवादी पार्टीचे शिबान फैज २३७, शाहिद शेख १३६ आणि नोटाला २०५ मते मिळाली. प्रभाग १७ (ड): शिवसेना ठाकरे गटाचे अक्षय योगेश वंजारी ४,१७५ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे तगडे उमेदवार प्रशांत सुरेश नाईक (३,७५० मते) यांचा ४२५ मतांनी पराभव केला. एमआयएमचे रियाज बागवान यांना २,८५१, अनिस शाह २,१२२, काँग्रेसचे मुजीब पटेल १,३५९, समाजवादी पार्टीचे अल्फैज पटेल ४६६, अपक्ष अक्रम देशमुख ४२६, आरिफ शाह १७२ आणि नोटाला १२६ मते मिळाली.









