ललित कोल्हे कारागृहातून विजयी तर भाजपचे चंद्रशेखर अत्तरदेंची बाजी
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात महायुतीची विजयी घोडदौड सुरूच आहे. प्रभाग ७ मधील ३ उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर ड जागेवर भाजपने विजय मिळवला. प्रभाग ११ मध्ये कोल्हे कुटुंबाने आपले वर्चस्व कायम राखले असून कारागृहातून निवडणूक लढवणारे ललित कोल्हे विजयी झाले आहेत. तर प्रभाग १२ मध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.

प्रभाग क्रमांक ७: तीन जागा बिनविरोध; ‘ड’ मध्ये भाजपचा विजय
प्रभाग ७ (अ, ब, क): या प्रभागातून भाजपच्या दीपमाला मनोज काळे (७ अ), अंकिता पंकज पाटील (७ ब) आणि विशाल सुरेश भोळे (७ क) हे तिन्ही उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. प्रभाग ७ (ड): केवळ एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांनी ४,१३५ मते मिळवून विजय संपादन केला. अपक्ष उमेदवार प्रा. डॉ. सचिन भीमराव पाटील यांना ३०१० मते मिळाली, शिवसेना ठाकरे गटाचे भिकन हिवराळे (२,३६० मते) तर २९३ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. ११२५ मतांनी अत्तरदे विजयी झाले.
प्रभाग क्रमांक ११: ललित कोल्हे आणि सिंधुताई कोल्हेंचा दणदणीत विजय
प्रभाग ११ (अ): शिवसेना शिंदे गटाच्या डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे ६,३०८ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष सुशीला ठाकूर (२,२६४ मते) यांचा ४,०४४ मतांच्या फरकाने पराभव केला. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका पार्वताबाई भिल यांना २,०३२, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हिना तडवी यांना ७१७, अपक्ष अरुणाबाई कोळी यांना ३३१ मते मिळाली. ६९७ जणांनी नोटाला पसंती दिली. प्रभाग ११ (ब): शिवसेना शिंदे गटाचे संतोष मोतीराम पाटील यांनी ५,०४९ मते मिळवत विजय मिळवला. त्यांनी अपक्ष कैलास हटकर (३,८१९ मते) यांचा १,२३० मतांनी पराभव केला. अपक्ष गिरीश भोळे यांना २,५७२, हिंदू महासभेचे डॉ. आशिष जाधव यांना ३६० आणि नोटाला ५४६ मते पडली. प्रभाग ११ (क): शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका सिंधुताई विजय कोल्हे यांनी ७,३६८ मते मिळवून आपला गड राखला. त्यांनी ठाकरे गटाच्या नीता संजय सांगोळे (२,०९९ मते) यांचा ५,२६९ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. संगीता मिस्त्री यांना ७०७, स्वराज्य शक्ती सेनेच्या जया साळुंखे यांना ४२२ आणि नोटाला ८५० मते मिळाली.
प्रभाग ११ (ड): कारागृहातून निवडणूक लढवणारे माजी महापौर ललित विजय कोल्हे ६,२०८ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी अपक्ष सुनील पाटील (१,९५३ मते) यांचा ४,२५५ मतांच्या फरकाने पराभव केला. काँग्रेसचे अपक्ष संजय मिस्त्री यांना १,४११, डॉ. किशोर माळी ९०७, मनसेचे राजेंद्र निकम ५७२, राष्ट्रवादी (शप) अनिल वाघ ३४५, संतोष बाविस्कर ३४५ आणि नोटाला ६०६ मते मिळाली.
प्रभाग क्रमांक १२: भाजपने राखला बालेकिल्ला; उज्वला बेंडाळे बिनविरोध
प्रभाग १२ (अ): भाजपचे अनिल सुरेश अडकमोल ७,०१७ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी (शप) चे ललितकुमार घोगले (२,०१७ मते) यांचा ५,००० मतांनी पराभव केला. माजी नगरसेवक किशोर भोसले यांना १,०२९, कृष्णा सपकाळे ४५१, नितेश कापडणे २८१ आणि नोटाला ६९४ मते मिळाली.प्रभाग १२ (ब): भाजपच्या उज्वला मोहन बेंडाळे या जागेवरून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. प्रभाग १२ (क): भाजपच्या गायत्री इंद्रजीत राणे यांनी ८,७२८ मते मिळवून मोठा विजय मिळवला. त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या रीना भारसके (१,८२० मते) यांचा ६,९०८ मतांनी पराभव केला. नोटाला ९७० मते पडली. प्रभाग १२ (ड): भाजपचे माजी नगरसेवक नितीन मनोहर बर्डे ७,११९ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी अपक्ष स्वप्नील परदेशी (१,८१५ मते) यांचा ५,३०४ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी (शप) सुरेश पवार यांना ९५३, वंचितचे जितेंद्र केदार ७५३, आपचे संजय निकुंभ २२७, बहुजन मुक्ती पार्टीचे खुशाल सोनवणे २३५ आणि नोटाला ४१७ मते मिळाली.









