प्रभाग ८, ९, १० मध्ये जनतेकडून भाजप-शिवसेना उमेदवारांना भरभरून मते
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक ८, ९ आणि १० चे निकाल हाती आले असून, यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी आपली पकड मजबूत केल्याचे दिसून आले आहे. प्रभाग ९ मध्ये शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर प्रभाग १० मध्ये अटीतटीच्या लढतीत भाजपने बाजी मारली आहे.

प्रभाग क्रमांक ८: भाजपचा ‘क्लीन स्वीप’
प्रभाग ८ (अ): भाजपच्या कविता सागर पाटील यांना ७,०२३ मते मिळाली, तर शिवसेना ठाकरे गटाच्या उज्वला कुलभूषण पाटील यांना ५,९८६ मते मिळाली प्रभाग ८ (ब): भाजपच्या मानसी निलेश भोईटे यांना ७,७५८ मते मिळाली, तर शिवसेना ठाकरे गटाच्या शोभा रवींद्र सोनवणे यांना ५,१८४ मते मिळाली. प्रभाग ८ (क): भाजपचे भागचंद उर्फ अमर जैन यांना ६,२८१ मते मिळाली, तर शिवसेना ठाकरे गटाचे मयूर चंद्रकांत कापसे यांना ६,२१७ मते मिळाली. अमर जैन यांनी ६४ मतांच्या फरकाने विजय मिळवला. याच जागेवर अपक्ष विजय पुंडलिक पाटील यांना ३६९ मते मिळाली. प्रभाग ८ (ड): शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र आत्माराम पाटील यांना ८,४४७ मते मिळाली, तर ठाकरे गटाचे पुनमचंद पाटील यांना ३,३०९ मते मिळाली. अपक्ष मंदा सोनवणे यांना ४३७ तर विनोद अनपट यांना ७१४ मते मिळाली.
प्रभाग क्रमांक ९: दोन जागा बिनविरोध; डॉ. चंद्रशेखर पाटील यांची रेकॉर्डतोड आघाडी
प्रभाग ९ (अ) आणि (ब): या प्रभागातून शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी आणि प्रतिभा गजानन देशमुख हे दोन्ही उमेदवार यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. प्रभाग ९ (क): भाजपच्या जयश्री राहुल पाटील यांना ६,६६१ मते मिळाली, तर अपक्ष सुनंदा सुधाकर पाटील यांना ४,३५१ मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाच्या सुवर्णा गायकवाड यांना १,६७०, अपक्ष सुनंदा महाले यांना २९२ आणि विजया अग्रवाल यांना ११४ मते मिळाली. प्रभाग ९ (ड): भाजपचे डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी ८,९०२ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवला. त्यांनी अपक्ष कुंदन सूर्यवंशी याना १,९०७ मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे निलेश ठाकरे यांना २,०५६ मते मिळाली.
प्रभाग १० (अ): भाजपचे सुरेश माणिक सोनवणे ६,५६७ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी ठाकरे गटाच्या कौशल्याबाई निकम यांना ४,९९२,काँग्रेसचे श्रीकांत गायकवाड यांना ९४१, कलाबाई शिरसाठ यांना १२०, पद्माकर सोनवणे यांना ९४ तर गौरव सुरवाडे यांना ६४ मते मिळाली. प्रभाग १० (ब): भाजपच्या माधुरी अतुल बारी ७,३२८ मते मिळवून विजयी झाल्या. ठाकरे गटाच्या पुष्पा विठ्ठल चौधरी यांना ५,१८१ मते मिळाली. प्रभाग १० (क): भाजपच्या कविता किरण शिवदे ७,१९७ मते मिळवून विजयी झाल्या.शिवसेना ठाकरे गटाच्या हसीनाबी शरीफ यांना ५,०७९, स्वराज्य शक्ती सेनेच्या फिरोजाबी यांना १९८ तर अपक्ष नीलू इंगळे यांना ३४८ मते मिळाली.
प्रभाग १० (ड): या जागेवर अत्यंत चुरशीची लढत झाली. भाजपचे जाकीर खान रसूल खान पठाण यांनी ५,८९३ मते मिळवून विजय मिळवला. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांना ५,७१७ मते मिळाली. केवळ १७६ मतांच्या निसटत्या फरकाने जाकीर खान यांनी पराभव केला. येथे काँग्रेसच्या छाया अडकमोल यांना ६०७, समाजवादी पार्टीच्या शेख मेहमुदाबी यांना १५०, अपक्ष नंदकिशोर भोई ४४६, चेतन सोनवणे ७१, अजय भोगे ४१, रंगरेज अमजद ३७ तर शेख अहमद नूर यांना १८ मते मिळाली.









