चुंचाळे ता.यावल (प्रतिनिधी) – येथील कोरोना च्या पाश्वभुमीवर गावातील सर्व नागरिकांची प्रांताधिकारी डाँ.अजीत थोरबोले यांच्या आदेशाने व साकळी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डाँ सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक संदिप शिदे आशा वर्कर अंगणवाडी सेवीका मदतनिस यांच्या पुढाकाराने थर्मल स्कँनिग व प्लस आँक्सिमीटर यंत्रणे व्दारे आरोग्याची चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे कोरोनाचा संसर्ग गावात झालेली असून गावाची काळजी घेत या उपक्रमाला सुरुवात केली आहे आरोग्य विभागातील आरोग्य सेवक संदिप शिदे,आशा वर्कर जयश्री चौधरी,सलिमा तडवी,अंगणवाडी सेविका रेखा तडवी,लताबाई कोळी,शाबीरा तडवी,मदतनिस योगीता चौधरी हे गावातील नागरिकांची घरोघरी जाऊन चाचणी करणार आहे यात काही संशयास्पद किवा कोणाला काही लक्षणे आहेत का यांची नोद करणार आहे याप्रंसगी ग्रामपंचायत उपसरपंच अरमान तडवी ग्रामसेवक के.आर.सपकाळे,तलाटी नेहते,कोतवाल विशाल राजपूत,ग्रामरोजगार सेवक दिपक कोळी,संगणक चालक सुधाकर कोळी आदिसह कर्मचारी उपस्थित होते
संलग्नके क्षेत्र








