नंदुरबार एसीबीची कारवाई
पारोळा ( प्रतिनिधी ) – विहिर सर्वेक्षण करण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच स्वीकारताना पारोळा येथील वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ भाऊसाहेब गोरख पाटील (३३) यास नंदुरबार एसीबीने अटक केली. त्यानंतर त्यास अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्याच्या जामीन नामंजूर करण्यात आला असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


जळगाव लाचलुचपत विभागाकडे हा तपास देण्यात आल्यामुळे त्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंग राजपूत व पथकाने सदर संशयित आरोपीस धुळे सब जेलमध्ये रवाना केले आहे. याबाबत पारोळा तालुक्यातील चोरवड येथे गुरुवार रोजी सायंकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आल्यानंतर लाचखोर हादरले आहेत.
सौर कृषिपंपाचे सर्वेक्षण सौर कृषी पंपासाठी करण्यासाठी ही लाच स्वीकारली. तक्रारदार शेतकरी आहेत. त्यांनी २१ जून २०२५ रोजी पत्नीच्या नावे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेंतर्गत मौजे पोपटनगर शिवार ता पारोळा येथील शेतात कृषी पंप योजनेंतर्गत मौजे पोपटनगर शिवार, ता. पारोळा येथील शेतात कृषी पंप बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला. त्यानंतर सर्वेक्षणासाठी २० सप्टेंबर २०२५ अशी तारीख मिळाली मात्र वीज कंपनीकडून कुणीही आले नाही तर ४ जानेवारी तक्रारदाराने वरिष्ठ तंत्रज्ञ भाऊसाहेब पाटील यांना फोन केल्यानंतर त्यांनी सर्वेक्षणासाठी पंधराशे रुपयांची लाच मागून १ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली.
लाच पडताळणीनंतर एसीबीने चोरवड, ता. पारोळा येथे गुरुवारी सापळा रचला व एक हजार रुपयांची लाच स्वीकारताच भाऊसाहेब पाटील यांना अटक करण्यात आली. या कारवाईने वीज वितरणच्या लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या नेतृत्वात हवालदार विजय ठाकरे. नरेंद्र पाटील. नाइक हेमंतकुमार महाले अशानी सापळा यशस्वी केला.









