प्रभाग १३ मध्ये महायुतीचा धडाका
जळगाव (प्रतिनिधी) :- निवडणूक रणधुमाळीत प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांच्या प्रचार रॅलीला आज मोहाडी रोड परिसरातील ओम शांती नगर येथून सुरुवात झाली.

ओम शांती नगर येथून निघालेली ही रॅली आदर्श नगर, रुस्तमजी शाळा, आणि आरटीओ कार्यालयामागील परिसरातून मार्गक्रमण करत गेली. रॅली दरम्यान प्रफुल्ल देवकर यांनी स्थानिक नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, ज्यावरून त्यांची वाढती लोकप्रियता दिसून येत आहे.
प्रचार रॅलीत रोहिदास पाटील, तन्मय चौधरी, ललित पाटील, राजेंद्र पाटील, रवी पाटील, दीपक पाटील, ललित देशमुख, रामेश्वर कोळी, शरद पवार आदी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीमुळे प्रभाग १३ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मतदारांचा कल प्रफुल्ल देवकर यांच्या बाजूने असल्याचे चित्र दिसत आहे.









