नेते नितीन बानुगडे पाटलांची तोफ धडाडणार, नागरिकांनी आशीर्वाद देण्यासाठी येण्याचे आवाहन
जळगाव ( प्रतिनिधी ) – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कंबर कसली असून, जळगावच्या राजकीय वातावरणात उद्या मोठी ठिणगी पडणार आहे. शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी पिंप्राळा येथे शिवसेनेच्या उमेदवारांचा भव्य ‘महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि प्रखर वक्ते नितीन बानुगडे पाटील यांची जाहीर सभा संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.

आपल्या धारदार शैलीत विरोधकांचा समाचार घेण्यासाठी ओळखले जाणारे बानुगडे पाटील उद्या संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंप्राळा येथे शिवसैनिकांना संबोधित करतील. या मेळाव्याच्या तयारीसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठी तयारी केली आहे. शिवसेनेच्या या शक्तीप्रदर्शनासाठी जास्तीत जास्त संख्येने शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी केले आहे.









