प्रभाग ७ ‘ड’ मध्ये भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांना जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव ( प्रतिनिधी ) – आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराचा धुराळा उडाला असून, प्रभाग क्रमांक ७ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. विशेषतः प्रभाग ७ ‘ड’ चे उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांना शिव कॉलनी आणि आशाबाबा नगर परिसरात नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ज्येष्ठ नागरिकांचा प्रेमाचा वर्षाव
प्रचारादरम्यान चंद्रशेखर अत्तरदे यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. काही ठिकाणी पुष्पहार घालून, तर काही ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन अत्तरदे यांचा सन्मान करण्यात आला. “तुमच्यासारखा सुशिक्षित आणि जनसंपर्क असलेला तरुण प्रतिनिधी प्रभागाला हवा आहे,” अशा भावना ज्येष्ठांनी यावेळी व्यक्त केल्या आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रभाग ७ मधील उमेदवार दीपमाला मनोज काळे, अंकिता पंकज पाटील, विशाल सुरेश भोळे तसेच माधुरी अत्तरदे, मनोज काळे, चेतन तिवारी, पंकज पाटील, माजी नगरसेवक नितीन ननवरे, मनोज भंडारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आशा बाबा नगर आणि शिव कॉलनी भागातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन चंद्रशेखर अत्तरदे यांनी यावेळी दिले. प्रभागातील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महिला आणि युवकांनीही या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन चंद्रशेखर अत्तरदे यांना आपला पाठिंबा दर्शवला. त्यांना मिळणारा हा प्रतिसाद पाहता, प्रभाग ७ मध्ये भाजपचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.










