जळगावमध्ये बसस्थानकात घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील नवीन बस स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी असताना मोबाईल चोरीची घटना समोर आली आहे. जामनेरला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विनोद युवराज महाजन (वय ३९, रा. हिवरखेडे बु. ता. जामनेर) हे दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव येथील नवीन बस स्थानकावर आले होते. तेथून ते जामनेरला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईल लांबवला.
मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर विनोद महाजन यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:२२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ संजय सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









