प्रचारात नागरिकामंध्ये उमेदवार इब्राहिम पटेल, अक्षय वंजारी लोकप्रिय
जळगाव (प्रतिनिधी) : येथील प्रभाग १७ मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नागरिकांकडून पसंती मिळत असून प्रचारात त्यांनी आघाडी घेतली आहे. येथील उमेदवार इब्राहिम पटेल, अक्षय वंजारी हे सर्व उमेदवारांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचे दिसून येत आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक १७ मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, मतदारांचा कल महाविकास आघाडीकडे झुकताना दिसत आहे. विशेषतः १७ क मधील उमेदवार इब्राहिम पटेल आणि १७ ड मधील अक्षय वंजारी यांना नागरिकांकडून मोठी पसंती मिळत असून ते प्रभागात अत्यंत लोकप्रिय ठरत आहेत.
प्रभाग १७ मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. उमेदवार इब्राहिम पटेल आणि अक्षय वंजारी यांनी प्रभागातील प्रत्येक गल्ली आणि घरापर्यंत पोहोचून मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. प्रलंबित विकासकामे, नागरी सुविधा आणि प्रभागाचा कायापालट करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून, त्यांच्या या भूमिकेला तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचाच पाठिंबा मिळत आहे.
इतर उमेदवारांच्या तुलनेत इब्राहिम पटेल आणि अक्षय वंजारी यांचा जनसंपर्क दांडगा असल्याचे चित्र आहे. “प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी सक्षम आणि सुशिक्षित नेतृत्वाची गरज आहे,” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रचार रॅली आणि कोपरा सभांमध्ये होणारी गर्दी पाहता, या उमेदवारांनी इतर प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
प्रचारात वैयक्तिक टीकेपेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर अधिक भर दिला जात आहे. स्वच्छ पाणी, रस्ते आणि ड्रेनेज लाईन यांसारख्या मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले आहे. महाविकास आघाडीच्या या आक्रमक प्रचारामुळे प्रभाग १७ मधील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









