जळगाव तालुक्यातील घटना
जळगाव प्रतिनिधी :

दि. ४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या घराच्या जिन्याजवळ मोबाईलवर बोलत उभी होती. फोनवर बोलणे संपवून जेव्हा त्या जिना उतरत होत्या, तेव्हा त्यांच्या घरासमोरच राहणारा संशयित आरोपी विजय सोनवणे याने त्यांना पाहून डोळा मारला आणि हाताने इशारे करून आपल्याकडे बोलावले. इतक्यावरच न थांबता, आरोपीने फिर्यादीच्या घराच्या जिन्याजवळ येऊन त्यांचा हात पकडला आणि अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. आरोपीने वाईट हेतूने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकारानंतर पीडित महिलेने तात्काळ जळगाव तालुका पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपी विजय सोनवणे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ दीपक चौधरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









