मायादेवी नगर, इंद्रप्रस्थ नगरमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव ( प्रतिनिधी ) – आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रभाग १२ ‘ड’ चे अधिकृत उमेदवार नितीन मनोहर बरडे यांनी रविवारी प्रभागात झंझावाती पदयात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधला. या प्रचार दौऱ्यात भाजपचे दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शक्तीप्रदर्शन केले.

नितीन बरडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रभागातील मायादेवी मित्र मंडळ परिसर, रोटरी भवन, स्वामी सद्गुरू मंडळ, सिद्धेश्वर नगर, गुरुदत्त हाउसिंग सोसायटी आणि इंद्रप्रस्थ कॉलनी या भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. ‘घर-घर चलो’ अभियानांतर्गत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि परिसराच्या विकासाचे आश्वासन दिले.
या प्रचार फेरीत भाजपचे जिल्हा सरचिटणीस राहुल वाघ यांच्यासह प्रभाग १२ मधील अन्य उमेदवार उज्ज्वला बेंडाळे, गायत्री इंद्रजीत राणे, अनिल सुरेश अडकमोल यांची प्रमुख उपस्थिती होती. जळगाव मंडळ क्रमांक ३ (सरदार वल्लभभाई पटेल, रामानंद नगर व महाबळ परिसर) चे अध्यक्ष अजित राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा यशस्वीरित्या पार पडला.
प्रचारादरम्यान भाजपचे सक्रिय पदाधिकारी आणि कार्यकर्ते वैशालीताई पाटील, सुनील चौधरी, चंद्रशेखर काकडे, शेखर जोशी, राजूभाऊ शिरसाट, कुलकर्णी, भीमाशंकर पाटील, पियुष महाजन, भावेश कोल्हे, केतन अत्तरदे, रोहीत देवरे, अजय चौधरी, सोनू पाटील, सागर ढेगे, संजय अत्रे, राजेश शिरसाठ, सचिन अडकमोल, बबलु शिंदे, राजेश साळुंखे, नरेंद्र मोरे, सचिन बोरसे, मिलिंद नारखेडे, खुशाल महाजन, संकेत कापसे, निरज बरडे, अजिंक्य पाटील, संतोष भंगाळे, ललित पाटील, सुदर्शन चौधरी आणि संतोष पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.










