तरुण, उच्चशिक्षित, स्थानिक नगरसेविका लाभल्याने आनंद असल्याची प्रतिक्रिया
जळगाव विशेष प्रतिनिधी

शहरातील प्रभाग क्रमांक ७ येथे शिव कॉलनी परिसरातील स्थानिक रहिवासी असलेल्या तरुण उच्चशिक्षित महिला अंकिता पंकज पाटील या नगरसेविकापदी बिनविरोध निश्चित झाल्यानंतर शिव कॉलनी, आशाबाबा नगर, आरएमएस कॉलनीतील नागरिकांनी त्यांच्या भावी निवडीचे स्वागत केले आहे.
परिसरातील ज्येष्ठ व महिला नागरिकांनी अंकिता पाटील यांना पुष्पहार घालून त्यांच्या बिनविरोध निवडीचे स्वागत केले. आमच्या प्रभागातील उमेदवार आम्हाला हवा होता. त्यानुसार उच्चशिक्षित व तरुण व्यक्तिमत्व आम्हाला नगरसेविका म्हणून लाभल्यामुळे आनंद असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.अंकिता पाटील यांच्या बिनविरोध बिनविरोध निवडीमुळे शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी त्यांचा गौरव केला आहे.
अंकिता पंकज पाटील या २०१८ या वर्षी देखील निवडणुकीसाठी उभ्या होत्या. मात्र काही मतांच्या फरकाने त्या पराभूत झाल्या होत्या. यंदा मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यानंतर ७ ब या प्रभागात इतर उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर त्यांची निवड निश्चित झाली आहे. ३२ वर्षीय अंकिता पाटील या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीमधील पदविकाधारक आहेत. तसेच त्यांचे पती पंकज सुरेश पाटील यांचा सामाजिक कार्याचा वारसा व वसा त्यांच्या सोबत आहे. आता प्रभागातील मूलभूत मूलभूत समस्यांसह शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमधील विकास करण्यासाठी त्या आगामी पंचवार्षिक काळात अग्रेसर राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.









