जळगाव (प्रतिनिधी) – गुरुवार ११ जून रोजी भाजपा अयोध्यानगर परिसर मंडल क्र. ३ तर्फे, हनुमान मंदीर,हनुमान नगर,अयोध्यानगर परिसर, प्रभाग क्र. १७ मध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात, पहिले वर्ष पूर्ण झाले असून, वर्षपूर्ती अभियान राबवत आहे.
केंद्र सरकारचा वर्षपूर्ती या अभियानानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे माहिती पत्रक आमदार सुरेश दामू भोळे व महापौर सौ. भारती कैलास सोनवणे, महानगराचे अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, प्रभाग समीती सभापती सौ. रंजना विजय वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना पत्रक वाटप करण्यात आले. याप्रसंगी जळगाव मनपा स्थायी समीती सुनिलभाऊ वामनराव खडके,भाजपा महानगराचे उपअध्यक्ष प्रदिपभाऊ रामकृष्ण रोटे, मातोश्री कट्रक्शनचे संचालक विजयभाऊ केशवराव वानखेडे वर्षपूर्ती अभियान संयोजक किसन मराठे, सहसंयोजक एकनाथ भावसार, अनिल चौधरी,पि.सि.पाटील,बुथप्रमुख कमलाकर,योगेश,स्वप्निल,शक्तिकेद्र प्रमुख अमोल,अनिकेत व कार्यकर्ते उपस्थित होते.