बोदवड तालुक्यात हळहळ
बोदवड (प्रतिनिधी):- तालुक्यातील सुरवाडे बुद्रुक येथील एका २८ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोपान नारायण पाटील (वय २८, रा. सुरवाडे बु. ता. बोदवड) या तरुणाने आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणावरून गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच ज्ञानेश्वर नारायण पाटील यांनी सोपानला तातडीने उपचारासाठी भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. ट्रॉमा केअर सेंटरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोपानची तपासणी केली असता, त्याला मृत घोषित करण्यात आले. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे बोदवड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलीस हवालदार विनोद श्रीनाथ हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे सुरवाडे परिसरात शोककळा पसरली आहे.









