महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस १९, सपा ८, एमआयएम ८ जागांवर देतेय लढत
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- येथील जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत सर्व पक्षांकडून अर्ज भरण्यामध्ये जोर लावण्यात आला. तसेच, उमेदवारांनी माघार घेऊन बिनविरोध होण्यासाठीपण अनेकांनी प्रयत्न केले. यात भारतीय जनता पार्टीचे ६ व शिवसेनेचे ६ असं १२ उमेदवार विजयी झाले. आता प्रत्यक्ष रिंगणात भाजपचे सर्वाधिक ४६ व एक पुरस्कृत असे ४७ उमेदवार रिंगणात आहे. त्यानंतर शिवसेना उबाठा ३६, शिवसेना शिंदे गट २३, राष्ट्रवादी शरद पवार गट २१, काँग्रेस १९ जागांवर लढत देत आहे.

जळगाव शहर महापालिकेत यंदा महायुतीच्या जागावाटपाचे त्रांगडे अखेरपर्यंत चालले. यात आता भाजपाला ४७, शिवसेनेला २३ तर राष्ट्रवादीला ६ जागा मिळाल्या आहेत. प्रभाग ६ क मध्ये भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ३६ उमेदवार रिंगणात असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे २१ उमेदवार लढताहेत. तर काँग्रेसनेही १९ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
रिंगणात उभे उमेदवार
भाजपा : ४६
शिवसेना शिंदे गट : २३
राष्ट्रवादी अजित पवार गट : ६
भाजप पुरस्कृत : १
शिवसेना उबाठा : ३६
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट :२१
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : १९
स्वराज्य शक्ती सेना : १२
वंचित बहुजन आघाडी : ३
समाजवादी पार्टी : ८
आम आदमी पार्टी : ३ (एकाचा डबल अर्ज)
एआय एमआयएम : ०८
मनसे : ५
बहुजन मुक्ती पार्टी : ०१
हिंदू महासभा : ०१









