प्रशांत कुमावत यांची भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती
जळगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव नगरपरिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या गटाची अधिकृत नोंदणी आज जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे करण्यात आली. चाळीसगाव नगरपरिषदेत पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने ही गट नोंदणी प्रक्रिया करण्यात आली.


यासोबतच चाळीसगाव नगरपरिषदेचे नगरसेवक प्रशांत कुमावत यांची भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर गट नोंदणीसाठी आवश्यक असलेला प्रस्ताव व कागदपत्रे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सादर करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.प्रतिभा चव्हाण, नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
चाळीसगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष एकसंघपणे कार्य करणार असल्याचा निर्धार यानिमित्ताने नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी व्यक्त केला.









