समर्थकांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
जळगाव विशेष प्रतिनिधी

जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ येथून अंकिता पंकज पाटील यांनी उमेदवारी अर्ज मंगळवार दि. ३० रोजी समर्थकांसह नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात दाखल केला आहे. तर भागामध्ये अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे यंदा तरुण तडफदार व नवीन उमेदवारांना तिकीट देण्यामध्ये प्राधान्य दिसून येत आहे. त्यातच आता अनेक वर्षांपासून प्रभागांमध्ये सामाजिक काम करीत असलेल्या नावांचा यादीमध्ये समावेश दिसून येणार आहे. त्यातच प्रभाग क्रमांक ७ येथे अंकिता पंकज पाटील यांना भारतीय जनता पक्षातर्फे ७ ब मधून संधी देण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता माजी नगरसेवक विनायक सोनवणे यांच्या निवासस्थानापासून समर्थकांसह व नागरिकांचे आशीर्वाद घेऊन अंकिता पंकज पाटील या महानगरपालिकेत दाखल झाल्या. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पक्षाने आम्हाला उमेदवारी दिल्यामुळे आम्ही आभारी आहोत. पक्षाचे नेते मंत्री गिरीश महाजन, निवडणूक प्रमुख आ. राजूमामा भोळे, निवडणूक प्रभारी आ. मंगेश चव्हाण, खा. स्मिताताई वाघ, नितीन लढ्ढा, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचे त्यांनी आभार मानले असून विकास कामांचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार असल्याची माहिती अंकिता पंकज पाटील यांनी दिली आहे.









