जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेर महायुती ठरली
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज दिवसभर विविध नाट्यमय घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे महायुती होण्याची चिन्हे दिसत नव्हते परंतु २ वाजता युती ठरली. त्यातच हॉटेल रॉयल पॅलेस येथे सुरू असलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये मोठे वादंग झाल्याची माहिती समोर आली. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन बैठकीतून काढता पाय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये महायुती करण्यासाठी चर्चा सुरू होती. मात्र चर्चा अंतिम स्तरावर आली आणि महायुती ठरली. दुसरीकडे मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना मात्र हॉटेल रॉयल पॅलेस येथे निवडणूक प्रमुख राजूमामा भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि अभिषेक पाटील यांच्यामध्ये व इतर पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये जागावाटप संदर्भात सकारत्मक चर्चा झालेली नाही. यातच अपेक्षित जागा मिळत नसल्याचे पाहून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
यातच महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नावाने लिहिलेल्या पत्रात, “माननीय अजितदादा पवार सो मी राजीनामा देत आहे” एवढेच त्यांनी म्हटले आहे. यामुळे महायुतीमध्ये वादळ उठले असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.









