अनेक दिग्गजांचे तिकीट कापले, घराणेशाहीसह निकटवर्तीयांना नेत्यांचे प्राधान्य ; प्रशांत नाईक घड्याळावर लढणार ?
जळगाव विशेष प्रतिनिधी
येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मंगळवारी दुपारी रंगत पाहायला मिळाली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांच्या मोठ्या रांगा बघायला मिळाल्या. दरम्यान भाजप आणि शिवसेनेची १० प्रभागातील यादी “केसरीराज”च्या हाती आलेली आहे यात अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले आहेत.

महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक ११ हा शिवसेनेकडे आला असून प्रभाग क्रमांक १२ हा भाजपकडे गेला आहे. प्रभाग क्रमांक ११ अ मध्ये डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, ११ ब मध्ये संतोष पाटील, क मध्ये सिंधुताई विजय कोल्हे, ड मध्ये ललित विजय कोल्हे हे निवडणूक लढणार आहेत. तर १२ प्रभागात मध्ये अ मध्ये अनिल अडकमोल, ब मध्ये उज्वला बेंडाळे, क मध्ये गायत्री राणे, ड मध्ये नितीन बरडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच प्रभाग क्रमांक ८ येथे मानसी निलेश भोईटे, कविता सागर पाटील आणि क मधून अमर जैन यांना संधी मिळाली आहे. १ जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये अ मध्ये मनोज सुरेश चौधरी, ब मध्ये प्रतिभा गजानन देशमुख हे शिवसेनेच्या तिकिटावर तर क मध्ये जयश्री राहुल पाटील आणि ड मध्ये डॉ.चंद्रशेखर शिवाजी पाटील भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहे.
प्रभाग क्रमांक ७ मधून अ मध्ये दीपमाला मनोज काळे, ब मध्ये अंकिता पंकज पाटील, क मध्ये विशाल सुरेश भोळे, क मध्ये चंद्रशेखर अत्तरदे यांना भारतीय जनता पक्षातर्फे तिकीट देण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक १० येथे अतुल बारी, किरण भोई, सुरेश सोनवणे आणि जाकिर पठाण यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १७ येथे चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढणार असून येथे अ मधून हिना युनूस पिंजारी, ब मध्ये सुमय्या वसीम पिंजारी, क मध्ये इकबालुद्दीन जीयाउद्दीन पिरजादे आणि ड मध्ये प्रशांत सुरेश नाईक हे निवडणूक लढणार आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये जितेंद्र मराठे आणि अंजना सोनवणे यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
१३ मध्ये नितीन सपके, ब मध्ये सुरेखा नितीन तायडे, क मध्ये वैशाली अमित पाटील हे भारतीय जनता पक्षाकडून तर ड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रफुल्ल गुलाबराव देवकर हे निवडणूक लढणार आहेत. प्रभाग क्रमांक १५ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून भगत बालानी, चेतन शिरसाळे, अरविंद देशमुख हे तिघे तर शिवसेनेकडून रेश्मा कुंदन काळे यांना तिकीट मिळाले आहे.
प्रभाग क्रमांक १८ हा शिवसेनेकडे गेला असून येथे १८ अ मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे, ब मधून नलुबाई तुळशीराम सोनवणे, क मधून प्रतिभा सुरेश भापसे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. १९ प्रभागामध्ये अ मध्ये रेखा चुडामण पाटील, ब मध्ये विक्रम उर्फ गणेश सोनवणे आणि क मधून प्रतिभा अनिल देशमुख हे शिवसेनेच्या तिकिटावर लढणार आहेत तर प्रभाग क्रमांक ड मध्ये राजेंद्र घुगे पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी निवडणूक प्रमुख आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.









