समर्थकांसह महानगरपालिकेत उपस्थिती
जळगाव (विशेष प्रतिनिधी) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मंगळवारी दि. ३० डिसेंबर महत्त्वाचा दिवस आहे. मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता शिवसेना शिंदे गटाकडून माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह यांच्या मातोश्री सिंधुताई कोल्हे व चिरंजीव पीयूष कोल्हे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.


जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दाखल एका गुन्ह्यामध्ये ललित कोल्हे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळे ते नाशिक येथील कारागृहात होते. रविवारी त्यांना रात्री उशिरापर्यंत जळगाव येथील कारागृहात आणण्यात आले. यावेळी सकाळी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कारागृहात यांनी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर ललित कोल्हे यांच्या वतीने त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच सिंधुताई कोल्हे आणि पियुष कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज घेऊन महापालिकेत दाखल झाले.

यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक ११ क मधून सिंधुताई विजय कोल्हे यांनी तर ११ ड मधून ललित विजय कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरला. तसेच पियुष ललित कोल्हे यांनी प्रभाग क्रमांक ४ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभागात केलेल्या विकास कामांसह सामाजिक कार्याच्या बळावर आम्ही निवडणुकीमध्ये जनतेसमोर जाणार आहोत अशी माहिती ललित कोल्हे यांच्या नातेवाईकांनी दिली.









