भाजपा घेणार पत्रकार परिषद, आ. मंगेश चव्हाण यांची माहिती

जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून इतर पक्षांची चर्चा सुरूच आहे. काही जागांवरून ताणाताणी सुरू असल्यामुळे चर्चा अंतिम होऊ शकलेली नाही. याबाबत निवडणूक प्रभारी आ मंगेश चव्हाण यांच्याशी “केसरीराज”ने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, मंगळवार दि. ३० रोजी दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्याच वेळेला सविस्तर माहिती पत्रकारांना दिली जाणार आहे.
याच पत्रकार परिषदेमध्ये उमेदवारांची यादी देखील जाहीर होण्याची दाट शक्यता भाजपातील सूत्रांनी वर्तवली आहे. भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांना फार्म भरून ठेवण्याविषयी सूचना देण्यात आली आहे. यातील अनेक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यास अपक्ष किंवा बंडखोरी करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.








