महायुती घटक पक्षाकडून लढण्याची माहिती !
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी ४२४ अर्जांची विक्री झाली. तर पहिला नामनिर्देशन अर्ज प्रभाग १२ अ मधून दाखल झाला आहे. महायुती घटक पक्षातर्फे अनिल अडकमोल यांनी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला.

प्रभाग क्रमांक १२ अ मधून अनिल अडकमोल यांनी भाजप व महायुती घटक पक्षातर्फे उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत आरपीआयचे नेते भरत मोरे, प्रताप बनसोडे, नरेंद्र मोरे, अक्षय मोरे, मिलिंद अडकमोल आदी उपस्थित होते.
प्रभाग १२ मध्ये समता नगर, महाबळ कॉलनी, मायादेवी नगर, रामानंदनगर, भूषण कॉलनी, पोस्टल कॉलनी, गिरणा टाकी परिसर आदी भाग येतात. मतदारांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद असून नक्कीच आम्ही या निवडणुकीत विजयी होऊ असा आशावाद अनिल अडकमोल यांनी व्यक्त केला.









